भारताच्या एसबीआयला हॉंगकॉंगने केला दंड

sbi
नवी दिल्ली – भारतीय स्टेट बँकेच्या शाखेला बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक आणि दहशतवादविरोधी अर्थपुरवठा कायद्यांतर्गत हॉंगकॉंगच्या मध्यवर्ती बँकेने दहा लाख डॉलर्सचा दंड ठोठावला आहे.

या देशात २०१२ मध्ये हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई असून, ती थेट भारतीय स्टेट बँकेविरोधात करण्यात आली आहे. एप्रिल २०१२ ते नोव्हेंबर २०१३ या काळात एसबीआयने ग्राहकांच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवले नाही. याशिवाय, आपल्या ग्राहकांच्या इतरांसोबत असलेल्या व्यावसायिक हितसंबंधांवर लक्ष ठेवण्यातही एसबीआयला अपयश आले आहे. देशातील राजकारणात ज्यांना खरा चेहरा उघड झाला, असे लोक आपले ग्राहक आहेत का, हे तपासण्याची जबाबदारी एसबीआयचीच होती. पण, या बँकेने तसे केले नाही, असा ठपका मध्यवर्ती बँकेने ठेवला आहे.

आपल्या ग्राहकांच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यात एसबीआयला आलेल्या अपयशामुळेच ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती हॉंगकॉंग नाणेनिधी प्राधिकरणाच्या महासंचालक मीना दातवानी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

Leave a Comment