उबेरची भारतात ६४०० कोटींची गुंतवणूक

uber
गेले कांही महिने सातत्याने वादाच्या भोवर्‍यात असलेल्या उबेर या ऑनलाईन टॅक्सी कंपनीने येत्या ९ महिन्यात भारतात १ अब्ज डॉलर्स म्हणजे ६४०० कोटी रूपयांची गुंतवणूक केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. कंपनीचे भारतातील अध्यक्ष अमित जैन म्हणाले ही गुंतवणूक प्रामुख्याने व्यवसाय विस्तारासाठी केली जात आहे. नवीन शहरे, नवीन उत्पादने यासाठी ही गुंतवणूक असेल.

जैन म्हणाले भारतीय बाजारात आम्हाला मिळालेलां प्रतिसाद उत्तम आहे आणि येथील बाजारात संधीही विपुल आहेत. चीनबरोबरच भारत हे व्यवसाय विस्तारासाठी आमच्या प्राथमिकतेवर आहे. येत्या ९ महिन्यात येथे ६४०० कोटींची गुंतवणूक करण्याचा आमचा मानस आहे. कंपनीने भारतातील नवीन ७ शहरांतही नुकतीच सेवा सुरू केली असून अमेरिकेनंतर आमच्यासाठी भारत हाच मोठा बाजार बनला आहे. पुढच्या ६ ते ९ महिन्यांत दररोज १० लाखांपेक्षा अधिक बुकींग होईल असा अंदाजही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Comment