रुग्णालयात लावणार औषधांची दरपत्रके

medicine
मुंबई : गोरगरीब रुग्णांची अव्वाच्या सव्वा दराने औषध किंमती आकारून आणि वैद्यकीय उपकरणे माथी मारून विविध खाजगी रुग्णालयात होणारी लूटमार थांबविण्यासाठी, त्याच्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठविला असल्याचे उच्च वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत सांगितले.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर उत्तर देताना केली. खाजगी रुग्णालये विविध औषधे तसेच वैद्यकीय उपकरणे गोरगरीब रुग्णांच्या माथी चढ्या दराने मारली जातात. राज्य सरकारचे कोणतेही नियंत्रण उरले नसल्याचा आरोप या वेळी सदस्यांनी केला. सरकारी आणि खाजगी रुग्णालयांत रुग्णांची मोठ्या प्रमाणावर लूटमार केली जात असून त्यावर सरकारचे नियंत्रणच नसल्याने रुग्णांची मात्र नाहक लूट केली जाते. ती तातडीने थांबविण्याची मागणी सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी केली.