महिंद्राची टीयूव्ही ३०० सप्टेंबरमध्ये येणार

tuv
महिंद्रा अॅन्ड महिंद्राने त्यांची नवी टफ, स्टायलीश एसयूव्ही सप्टेंबरमध्ये बाजारात येत असल्याचे जाहीर केले असून या गाडीचे नामकरण टीयूव्ही ३०० असे केले गेले आहे. ६.२३ लाखांपासून ८.८९ लाखांपर्यंतच्या किमतीत ही गाडी उपलब्ध करून दिली गेली आहे.

कंपनीचे अध्यक्ष आनंद महिंद्र म्हणाले, आमची या सेगमेंटमधील वाहनांशी स्पर्धा मुख्यत्वे हुंदाई आणि फोर्डबरोबर असली तरी पहिली लढाई आमच्या डिझाईन टीम बरोबर आहे कारण या टीमचे प्रमुखपद एका महिलेकडे आहे. फ्लॅट रूफ, हाय फ्रंट नोज, हाय ग्राऊंड क्लिअरन्स, स्ट्रेट बॉनेट अशी या गाडीची वैशिष्ठ्ये आहेत आणि तिचे डिझाईन व विकास चेन्नईतील महिंद्र रिसर्च व्हॅलीमध्येच केले गेले आहे. या गाडीचे उत्पादन पुण्याजवळील चाकण येथे एमव्हीएमएल प्लँटमध्येच केले जाणार आहे.गाडीला अॅडव्हान्स्ड एम हॉक इंजिन दिले गेले आहे.

ही गाडी डिझाईन करताना प्रामुख्याने ग्राहकाच्या गरजा विचारात घेतल्या गेल्या आहेत. टफ, बोल्ड आणि दणकट अशी ही गाडी ग्राहकांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करेल असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.