पहिल्यांदाच दोन हातांचे यशस्वी प्रत्यारोपण

transplant
वॉशिंग्टन : आठ वर्षांच्या मुलाच्या दोन्ही हातांचे अमेरिकेतील डॉक्टरांनी यशस्वी प्रत्यारोपण केले असून जगातील ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तब्बल दहा तास चाललेल्या या शस्त्रक्रियेमध्ये डॉक्टरांनी झियॉन हार्वे या मुलावर हात आणि सांध्यांच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली. काही दिवसांपूर्वी संसर्गजन्य आजारामुळे या मुलाचे हात, सांधे आणि मूत्राशय निकामी झाले होते. ही शस्त्रक्रिया तशी खूप गुंतागुंतीची असल्यामुळे आधी सर्व डॉक्टरांना प्रशिक्षण घ्यावे लागले. त्यानंतर पूर्ण नियोजन आखूनच आम्ही ही शस्त्रक्रिया केल्याचे ‘चिल्डड्ढन्स हॉस्पिटल ऑफ फिलाडेल्फिया’ चे संचालक स्कॉट लेव्हिन यांनी सांगितले. या जटील शस्त्रक्रियेमध्ये ४० विविध आजारांचे डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचारी सहभागी झाले होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही