ट्विटरवर मराठीसह आणखी ७ भारतीय भाषा

twitter
आता मायबोली मराठीचा गोडवा लोकप्रिय मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट ट्विटरवर अनुभवता येणार असून ट्विटर सात भारतीय भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. तीन भारतीय भाषांचा याआधी समावेश होता, आता त्यात आणखी चार भाषांचा समावेश केला आहे.

ट्विटर मराठी, गुजराती, कन्नड आणि तामिळमध्ये आता उपलब्ध करण्यात आले असून आतापर्यंत केवळ इंग्रजीसह हिंदी आणि बंगाली या भारतीय भाषांमध्ये ट्विटर उपलब्ध होते. यासोबतच या नव्या बदलानुसार स्मार्टफोन युजर्सना भारतीय भाषांमध्ये ट्विटर वापरणे शक्य होण्यासाठी अँड्रॉईड अॅप अपडेट केले जाणार आहे.

Leave a Comment