अमेरिकेत लठ्ठपणा दूर करणारे औषध

msp
मॅनहॅटन (अमेरिका) : अमेरिकेतील कन्सास विद्यापीठाने जाडेपणाला छुमंतर करणारे ‘एमएसपी’ हे औषध तयार केल्याचा दावा केला आहे. या औषधाच्या सेवनाने शरीरातील चरबी (फॅट) वाढवण्यासाठी कारणीभूत ठरणारे घटक नष्ट होतील, असा दावा कन्सास विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे.

सतत बसून काम करणे, जंक फूड आणि शीतपेयांचे सेवन, रात्री-अपरात्रीपर्यंत काम करणे या कारणांमुळे अनेकांना जाडेपणाची समस्या भेडसावत आहेत. लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त असलेल्यांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. पण ‘एमएसपी’ या औषधामुळे जाडेपणाच्या समस्येवर ठोस उपाय सापडेल, असा दावा कन्सास विद्यापीठातील संशोधक करत आहेत. जाडेपणाच्या समस्येवर उपचार करण्याचा दावा करणारी विविध कंपन्यांची अनेक औषधे बाजारात उपलब्ध आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही