रणबीर रेनाँचा ब्रँड अँबेसिडर

ranbir
फ्रेंच कार कंपनी रेनाँने कंपनीचा ब्रँड अँबेसिडर म्हणून बॉलीवूड अभिनेता रणबीरकपूर याची नियुक्ती केली असून रणबीरच्या लोकप्रियतेचा व्यवसाय वाढीसाठी नक्कीच उपयोग होईल अशी आशा व्यक्त केली आहे. कंपनीचे भारतातील सीईओ व व्यवस्थापकीय संचालक सुमित सावने या संदर्भात बोलताना म्हणाले की रणबीर कपूर खानदानातील चौथ्या पिढीचा वारस असून अतिशय टॅलंटेड आहे. तो उत्तम अभिनेता आहे आणि देशातील नागरिकांच्या हृदयात त्याला आणि आमच्या कंपनीला स्थान मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.

कंपनीने भारतात चार वर्षे पूर्ण केली असून भारतीय बाजारात आपला हिस्सा वाढविण्याचा हेतू साध्य करण्यासाठी नवीन प्रॉडक्ट बाजारात आणण्याबरोबरच देशभर नवीन डिलरशीप देण्याचाही सपाटा लावला आहे. देशात कंपनीने २८० सेल्स व सर्व्हिस आऊटलेट सुरू केली आहेत.

रणबीरने या नव्या जबाबदारीबद्दल बोलताना सांगितले की रेनॉ ही जगातील एक चांगली कार उत्पादक कंपनी आहे आणि या कंपनीचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी आनंदी आहे. भारतीय बाजारात कंपनीची कामगिरी सरस आहे आणि ती आणखी चांगली होईल याचा विश्वास वाटतो.