२० हजार ५०० रुपये प्रति तोळा होणार सोने !

gold
नवी दिल्ली – अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात या वर्षाच्या अखेरीस जर वाढ केल्यास देशात सोन्याचे दर प्रति तोळा २० हजार ५०० रुपयांपर्यंत घसरतील अंदाज इंडिया रेटिंग अँड रिसर्चने व्यक्त केल्यामुळे भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठी कपात होण्याची शक्यता आहे.

फेडरल रिझ्रर्व्हकडून व्याजदर वाढवण्यात आल्यास याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होईल. सोन्याचे दर प्रति तोळा २० हजार ५०० ते २४ हजारापर्यंत घसरण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारातही या मौल्यवान धातूच्या किंमतीत कपात होण्याची शक्यता आहे. सोन्याचे जागतिक बाजारात दर प्रति औंस ९०० ते १०५० डॉलरपर्यंत घसरण्याची शक्यता आहे.

Leave a Comment