राष्ट्रीय कृषी विमा योजनेत सहभागासाठी ३१ जुलै पर्यंत मुदत

krishi-vima-yojna
पुणे – राज्यातील सर्व जिल्हयात खरीप हंगाम २०१५ मध्ये राष्ट्रीय कृषी विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या योजनेत शेतकऱ्यांना त्यांचा सहभाग ३१ जुलै २०१५ नोंदविता येईल. या योजनेमध्ये तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य तसेच ऊस, कापूस आणि कांदा या नगदी पिकांचा विमा काढण्यात येतो.

जुलै २०१५ मध्ये पेरण्या पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना नैसिर्गक आपत्ती, किड आणि रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकांचे नुकसान झाल्यास या कृषी विम्याचे सरंक्षण मिळते. खरीप हंगाम २०१४ मध्ये सहभागी झालेल्या सुमारे चव्वेचाळीस लाख एकोणऐंशी हजार शेतकऱ्यांपैकी चौतीस लाख सत्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सुमारे सोळाशे कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली होती. या योजनेत सहभागी होण्यासाठी नजीकच्या विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, यांच्या कार्यालयाशी अथवा भारतीय कृषी विमा कंपनी, मुंबई किंवा जवळच्या बॅकेशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

Leave a Comment