घरकामगार हवेत, नॅशनल करियर पोर्टलवर मिळतील

national-career
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच लाँच केलेल्या नॅशनल करियर सर्व्हिसमुळे घरकाम करण्यासाठी नोकर मिळविताना येत असलेल्या अडचणींवर मात करता येणे जसे शक्य होणार आहे त्याचबरोबर या प्रकारची कामे करणार्‍यांनाही काम मिळणे सुलभ होणार आहे. या पोर्टलवर वाहनचालक, घरकाम करणारे कामगार, प्लंबर, इलेक्ट्रीशिअन, केअर टेकर अशा अनेक कामांसाठी लागणार्‍या कामगारवर्गाची माहिती सर्वसामान्यांना उपलब्ध होणार आहे आणि ती आधार कार्डशी लिंक केलेली असल्याने त्यांची माहिती खरी असणार आहे.

कामगार मंत्रालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधानांच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला तर ती जगातील सर्वात मोठे रोजगार पोर्टल बनेल. असंघटीत क्षेत्रात काम करणार्‍यांनाही हे पोर्टल उपयुक्त आहे आणि त्याचबरोबर अन्य नागरिक, छोटे उद्योजक, छोटे व्यापारी हेही त्यांची नोंद येथे करू शकणार आहेत. ही सेवा पूर्णपणे मोफत पुरविली जाणार आहे.

या पोर्टलसंदर्भात सरकारी मंत्रालयातील एक प्रतिनिधी मंडळ लवकरच औद्योगिक संघटनांचा दौरा करणार असून त्यांना या पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करणार आहेत.

Leave a Comment