बाजारात आली नाविन्यपूर्ण मल्टीक्स आयशर

multix
औरंगाबाद – भारतातील पहिल्या वैयक्तिक उपयुक्तता वाहन मल्टीक्स आयशर बाजारात आयशर पोलारिस प्रायव्हेट लिमिटेड आणि पोलारिस इंडस्ट्रीज (आयएनसी) यांच्या संयुक्त विद्यमाने उपलब्ध झाले आहे. या संदर्भात कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधेश वर्मा यांनी महिती दिली आहे.

खास डिजाईन आणि एक विश्वासू डिझेल इंजिनने परिपूर्ण मल्टीक्स दोन प्रकारात आणि चार रंगामध्ये उपलब्ध होणार आहे. तसेच ग्राहकांच्या गरजेनुसार यामध्ये बदल करता येणार आहे. मल्टीक्सच्या कॅबिनमध्ये पाच कुटुंब सामानासह सामावू शकतात. मल्टीक्समध्ये एक्पोर्ट पॉवर टेक ऑफ पॉईंटचा समावेश आहे. त्यातून ३ केडब्ल्यु उर्जा निर्माण केली जाऊ शकते. त्याचा वापर घरी, शेतात वॉटर पंप्स कॉम्प्रेसर आणि इतर अनेक साधनांना उर्जा देण्याकरीता करता येणार आहे.