फेरारी त्यांच्या ४८८ जीटीबीचा नवा अवतार लाँच करण्याच्या तयारीत असून सप्टेंबरमध्ये फ्रँकफर्ट येथील मोटर शोमध्ये ती लाँच केली जाईल असे समजते. नवीन मॉडेल ४८८ स्पायडरवरच बेतलेले असल्याचे सांगितले जात आहे.
फेरारीच्या ४८८ जीटीबीचा नवीन अवतार येणार
ही कार फेरारीच्या आत्तापर्यंतच्या मॉडेल्समध्ये सर्वात ताकदवान मिड रियर इंजिन व्ही आठ असलेली कार आहे. ही कार एरोडायनामिक्स इफिशिएंट असून तिची चासी ११ विविध अल्युमिनियम संयुगातून तयार करण्यात आली आहे. यात मॅग्नेशिअमचाही वापर केला गेला आहे. परिणामी ही कार अतिशय मजबूत बनली असल्याचा कंपनीचा दावा आहे.
या मॉडेलचे हार्ड टॉप पूर्णपणे फोल्ड करण्यासाठी आणि पुन्हा उघडण्यासाठी केवळ १४ सेकंद लागतात. गाडीचा टॉप स्पीड ताशी ३२५ किमी आहे. म्हणजेच दिल्ली ते मुंबई हे १४३९ किमीचे अंतर पार करण्यास या गाडीला पाच तासांपेक्षाही कमी वेळ लागणार आहे. ही कार ११.४ लिटर इंधनात १०० किमीचे अंतर कापू शकेल असेही समजते.