चीनमध्ये तयार झाली अवघ्या १० सेकंदात चार्ज होणारी बस

bus
बीजिंग- चीनमध्ये जगातील सर्वात वेगाने चार्जिंग होणारी बस तयार झाली आहे. ही बस अवघ्या दहा सेकंदात चार्ज होते. या बसचे उद्घाटन निगबो शहरात करण्यात आले. ही बस ११ किलोमीटर परिसरात धावणार असून २४ थांबे आहेत, अशी माहिती शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिली आहे.

वीजेवर चालणा-या १२०० बसेस येत्या तीन वर्षात सुरू करण्यात येणार आहेत. एकदा चार्ज केल्यानंतर ही बस पाच किलोमीटर चालेल. त्यानंतर तिला पुन्हा चार्जिग करावे लागणार आहे, अशी माहिती झुझोऊ इलेक्ट्रीक लोकोमोटिव्ह कंपनीचे अध्यक्ष झोऊ क्विंघी यांनी दिली.

या वीजेवर चालणा-या बसमुळे ३० ते ५० टक्के वीज वाचणार आहे. या बसमधील कॅपॅसिटर दहा लाख वेळा चार्ज केल्यानंतरही चालू शकणार आहे, अशी माहिती क्विंघी यांनी दिली.

Leave a Comment