आंध्रच्या तिरुपतीला टक्कर देणार तेलंगणाचा नरसिंहा!

telangana
तेलंगणा : आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ही दोन राज्य विभक्त झाल्यानंतर आता तेलंगणाने आंध्र प्रदेशातल्या तिरुपती मंदिराला टक्कर देण्याची तयारी सुरु केली असून त्याचपार्श्वभूमीवर तेलंगणाच्या यदागिरी टेकडीवर एक भव्य मंदिर उभारले जाणार आहे.

तेलंगणाचे आंध्रपासून विभाजन झाल्यानंतर या राज्यातील मंदिरांचेही विभाजन करण्यात आले होते. मात्र तिरुपती, मल्लिकार्जून आणि कालाहष्टी सारखी प्रसिद्ध देवस्थाने आंध्रातच राहिली. तुलनेने तेलंगणाच्या वाट्याला छोटी मंदिरे आल्यामुळे आता तेलंगणाही स्वतःच्या राज्यात मोठी मंदिर उभारण्याच्या तयारीत असून तेलंगणात नरसिंहाचे भव्य मंदिर उभारले जाणार आहे. तेलंगणा सरकार दरवर्षी यासाठी आपल्या अर्थसंकल्पात १०० कोटींची तरतूदही करणार आहे. पुढच्या ३ वर्षांपर्यंत तेलंगणा सरकार दरवर्षी १०० कोटी याप्रमाणे ३०० कोटी या मंदिरासाठी खर्च करेल. तसेच या मंदिराचा घूमटही सोन्याने मढवला जाणार आहे. ज्यासाठी तब्बल ५० कोटी रुपये खर्च होणार असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment