भारतीय वैज्ञानिकांचे संशोधन; मधुमेह होणार की नाही आधीच कळणार !

dibetics
चेन्नई : अनेकांना आहाराचे पथ्य न पाळल्यास डायबिटीज होईल की काय या भीतीने ग्रासलेले असते; परंतु तुम्हाला आता घाबरण्याची गरज नाही, कारण डायबिटीज होणार आहे की, नाही हे तुम्हाला आधीच कळणार आहे. एकदा रक्त तपासणी केल्यानंतर तुम्हाला डायबिटीज होणार आहे की, नाही याचे निदान होण्याचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे.

याचा शोध चेन्नईतील रामचंद्रन डायबिटीज हॉस्पिटलच्या वैज्ञानिकांनी लावला असून प्री-डायबीटिक स्टेजवर असलेल्या काही ‘बायोमार्कर्स’ ची ओळख केली आहे. ही माहिती डायबिटीज़ ‘रीसर्च ऐंड क्लिनिकल प्रॅक्टिस’ मध्ये छापण्यात आली आहे. भारतीय वैज्ञानिकांनी ३५ ते ५५ वर्षांच्या केलेल्या संशोधनानंतर याचा शोध लागला आहे. बायोमार्कर्स आणि बायोकेमिकल्समधून काही रोगांची शक्यता पडताळून पाहता येते. संशोधकांनी याआधी कँसर आणि हृद्या संबंधित रोगावरही अशाच प्रकारे रोगनिदान केले होते. परंतू आतापर्यंत डायबीटीजचे रोगनिदान करण्यात संशोधकांना यश आले नव्हते. परंतू यावेळी सशोधकांने दोन बायोमार्कर्स ऐडिपोनेक्टिन आणि इंटरलूकिन-६ ची ओळख केली त्यामुळे संशोधकांना डायबीटीजची ओळख पटवण्यात यश आले. ऐडिपोनेक्टिन एक प्रोटीन असून ती इंसूलिनच्या प्रति संवेदनशीलता वाढविते. इंटरलूकिन-६ असा मार्कर आहे की, तो डायबीटीज आणि अन्य काही होणा-या समस्यांकडे इशारा करतो. ऐडिपोनेक्टिनचे कमी लेवल आणि इंटरलूकिन-६ चे जास्त लेवल म्हणजेच त्या व्यक्तीला दोन वर्षांपर्यंत डायबीटीज होऊ शकतो की नाही हे सांगतात. डॉक्टरांच्या मते, डायबीटीजचे रोगनिदान करण्यासाठी व्यक्तीचे वय, परिवाराची पाश्र्वभूमी, तणाव, बीएमआय आणि लठ्ठपणा याचा आधार घेण्यात आला आहे. या नव्या संशोधनामुळे डायबीटीजला रोखण्यासाठी मदत होऊ शकते असा दावा संशोधकांनी केला आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment