स्मार्टफोन महागडे असोत वा सर्वसामान्यांना परवडणार्या किमतीतील असोत, युजरची त्यांच्याबाबत एक तक्रार कायम असते ती चार्जिग संपण्याची. म्हणजेच बॅटरी डाऊन होण्याची. म्हणजे त्यासाठी चार्जर एकतर सतत बरोबर ठेवायला हवा. अर्थात चार्जर बाळगणे ही एक अडचणच. फोनमध्ये कॅमेर्यासारखे फिचर्स असतील तर बॅटरी आणखी लवकर डाऊन होते मात्र यावर आता एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.
स्मार्टफोनसाठी कागदासारखा पातळ सोलर चार्जर
जगात सर्वत्र सौर उर्जेवर सुरू असलेल्या संशोधनाचे फलित म्हणजे उन्हाने उपकरणे चार्ज करणार्या चार्जरची निर्मिती. मात्र यासाठी मोठमोठ्या सोलर पॅनलची गरज नाही.सिओल शिकागो येथील यॉक कंपनीने तयार केलेले हा चार्जर अक्षरशः कागदाइतका पातळ असून डायरीत सहजी मावेल असा आहे. या चार्जरची मोबाईल बाजारात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी त्याचा अडीच तास वापर करावा लागतो. त्याची तीन पॅनल ७.५ वॅट उर्जा निर्माण करतात. १० वॅट उर्जा निर्माण करणारे व्हर्जनही कंपनीने उपलब्ध करून दिले आहे.