जगातील पहिला मानवविरहित कारखाना चीनमध्ये

robo
बीजिंग – चीनने पुन्हा एकदा तंत्रज्ञान क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केले असून खेळणी तसेच मोबाइल जगतात अत्यल्प किमतीत दर्जेदार उपकरणांच्या निर्मितीमुळे या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या चीनने रोबोटिक क्षेत्रातही मुसंडी मारली आहे.

चीनला जगातील पहिला मानवविरहित कारखाना उभारण्याचा बहुमान मिळाला आहे. या कारखान्यातील प्रत्येक काम संगणकाद्वारे नियंत्रित रोबोटच्या हाती सोपवण्यात आले आहे. हे रोबोट कारखान्यातील एखादी वस्तू हलवण्यापासून ते ट्रकमधून वाहतूक करण्यापर्यंतची सर्व कामे करतात. चीनच्या डांग्गुआनमध्ये चँगिइंग प्रिसिझन टेक्नोलॉजी कंपनीचा “वर्ल्ड फॅक्टरी’ नावाचा कारखाना असून या ठिकाणी मोबाइल तसेच त्याच्याशी संबंधित उपकरणे तयार केली जातात. मानवी कौशल्यांशी या रोबोटची तुलना केल्यास हे मानवांपेक्षाही सरस असल्याचे आढळून आले आहे. कामांची अचूक माहिती नसली तरी रोबोट हे प्रशिक्षित आणि तज्ज्ञ मनुष्यबळापेक्षा उत्कृष्ट आणि दर्जेदार उत्पादन तयार करत आहेत.

Leave a Comment