९६ लाखाला पडला रॅटल स्नेक सोबतचा सेल्फी

ratel-snake
लंडन- चक्क रॅटल स्नेकसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न सॅन डिएगोच्या एका बहाद्दराने केला. या व्यक्तीचे नाव फासलर असे आहे.

रॅटल स्नेकला बहुतेक त्याची पोज आवडली नसावी म्हणून सापाने त्या व्यक्तीचा चावा घेतला. त्यानंतर त्याला उपचारासाठी दीड लाख डॉलर किंवा ९६ लाख रुपये मोजावे लागले. रॅटल स्नेक हा वाळवंटात सापडणारा अतिशय विषारी साप असतो. हा साप फासलरने पाळला होता. जेव्हा या सापाने त्याला चावले त्यानंतर त्याने हा साप जंगलात सोडून दिला. साप चावल्यानंतर त्याचे प्रतिविष फासलरकडे होते त्यामुळे त्याचा जीव वाचला परंतु पुढील उपचारासाठी त्याला भरपूर मोठी रक्कम मोजावी लागली आहे.

Leave a Comment