सोन्याची घसरगुंडी थांबेना- २३ हजाराखाली येणार दर

gold
आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक बाजारात सोने दरातील घसरण कायम असून येत्या महिन्यात सोने दर २३ हजार रूपयांखाली येतील असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर गेल्या पाच वर्षातील निचांकी पातळीवर आहेत त्यात चीन व भारताकडून सोन्याची मागणी कमी झाली आहे आणि अमेरिकेत व्याजदारात वाढ होणार हे नक्की असल्याने सोन्यातील गुंतवणूकही कमी होऊ लागल्याचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे.

स्थानिक बाजारात गेल्या चार दिवसांत सोन्याचे दर १० ग्रॅममागे १ हजारानी उतरले आहेत.चीनने सोमवारी पुन्हा ५ टन सोनेी विकले असल्याने दरात ४ टक्के घसरण झाली आहे. सध्या लग्नसराई नाही आणि नवीन ग्राहक भाव अजून खाली येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. ग्रामीण भागातूनही सोन्याला मागणी नाही त्यामुळे भावाची घसरगुंडी अशीच सुरू राहील असे सांगितले जात आहे.

गोल्डमन सॅच ग्रुपच्या म्हणण्याप्रमाणे सतत १० व्या दिवशी सोन्यात घसरण झाली आहे. १९९६ नंतर प्रथमच अशी दीर्घ घसरण पाहायला मिळते आहे. हे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात १००० डॉलर्स प्रति औसांच्या खाली येण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली आहे.

Leave a Comment