तब्बल ४० प्रकारची फळे लागतात एकच झाडाला

tree
वॉशिंग्टन : एका झाडाला ४० वेगवेगळ्या प्रकाराची फळे लागणाऱ्या झाडाची निर्मिती अमेरिकेतील सेराक्यूज युनिवर्सिटीमधले विज्युवल आर्टसचे प्रोफेसर वैन अॅकेन यांनी केली आहे. या झाडाचे नाव ‘ट्री ऑफ ४०’ असे असून त्याला तब्बल ४० निरनिराळ्या प्रकारची फळे येतात.

जर्दाळू, पीच, चेरी, आलबुखार यासारख्या प्रकारांचा या फळांमध्ये समावेश आहे. फळे तसेच भाज्यांच्या उत्पादनाला घेऊन असलेले पारंपारिक विचार बदलण्याच्या हेतूने ‘ट्री ऑफ ४०’ या झाडाची निर्मिती केली आहे असे वैन अॅकेन यांनी सांगितले आहे. २००८ पासून ‘ट्री ऑफ ४०’ या प्रकल्पावर काम सुरू झाले होते. अॅकेन यांनी यासाठी न्यूयॉर्कमधील स्टेट अॅग्रिकल्चरल एक्सपेरिमेंटमध्ये एक बगीचा पाहिला. ज्या बगीच्यात २०० निरनिराळ्या प्रकारची आलबुखार आणि पीच यांची झाडे होती. त्यांनी या बगिच्याला भाडेतत्वावर घेऊन ग्राफ्टिंगच्या मदतीने ‘ट्री ऑफ ४०’ या प्रकल्पाला पूर्णत्वास नेले.

Leave a Comment