
नवी दिल्ली- डिसेंबरमध्ये रिलायन्सच्या ४ जी सेवेचा शुभारंभ होणार असल्याचे कंपनीने जाहीर केले. १००० पेक्षा जास्त जिओ केंद्रामधून ही सेवा देशभरामध्ये पुरविण्यात येणार आहे.
डिसेंबरमध्ये फुटणार रिलायन्सच्या ४ जी सेवेचा नारळ
यासोबतच या जिओ सेंटर्समधून कंपनी रिलायन्सचे हॅंडसेटही विकणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मुकेश अंबानी यांनी या प्रकल्पामध्ये आतापर्यंत १५ अब्ज डॉलर गुंतवले आहेत. येत्या काही आठवड्यामध्ये ४ जी सेवेची मोठ्या प्रमाणावर चाचणी घेण्यात येणार आहे. रिलायन्स कंपनीतर्फे ४ जी साठी एलटीई स्मार्टफोनचा पर्याय देण्यात येणार आहे. जिओ सेंटर्स व्यतिरिक्त देशभरात ५,००,००० आउटलेट असणार आहेत. ४ जी सुविधा असणारे स्मार्टफोन बाजारात उपलब्ध राहावेत यासाठी रिलायन्स अॅपल, शिओमी, सॅमसंग या कंपन्यांच्या संपर्कात आहे.
