हार्टबीटनुसार चमकणारी कार

lexus
आपण कार म्हटले की सर्वप्रथम कारचा लूक आणि स्पीड पाहतो. मात्र लक्झरी कार मेकर लेक्ससने जगातली पहिली हार्टबीट कार सादर केली आहे. यात चालकाच्या हार्टबीटनुसार कारच्या बॉडीवर डिस्प्ले केला जातो.त्यामुळे या कारबद्दल कारप्रेमींना विशेष औत्सुक्य निर्माण झाले आहे.

ही वन ऑफ आरसीएफ हाय परफॉर्मन्स कूपे कार ऑस्ट्रलिया व क्रिएटिव्ह एजन्सी एम अॅन्ड सी यांनी एकत्र येऊन तयार केली आहे. या कारमध्ये असे तंत्रज्ञान वापरले गेले आहे, ज्यामुळे चालकाचे हार्टबीट मॉनिटर केले जातात. म्हणजे चालकाच्या हृदयाची धडधड अचानक वाढलीच तर कारमधील तंत्रज्ञानाच्या माध्यामतून जो डेटा गोळा केला गेला आहे त्यानुसार कारच्या बॉडीवर इलेक्ट्रीक चार्ज पोहोचविला जातो आणि कारवर लावलेला इलेक्ट्रॅनिक्स लुमिनिसंट पेंट चार्जच्या मदतीने चमकू लागतो असे समजते.