…तर पुढील १० वर्षांत चंद्रावर कायमस्वरूपी तळ उभारणे होईल शक्य

nasa
वॉशिंग्टन : पुढील दशकभरात चंद्रावर कायमस्वरूपी तळ उभारणे शक्य होईल, असा दावा संस्थेच्या अभ्यासाद्वारे करण्यात आला आहे. तसे झाल्यास आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाप्रमाणेच चंद्रावरही मनुष्याला राहता येणार आहे.

यासाठी ‘नासा’ ने तयारी सुरू केल्याची माहिती असून ‘नेक्सजेन’ अंतराळ संस्था आणि ‘नासा’ यांच्या संयुक्त माध्यमातून ही मोहीम राबवली जाणार आहे. या दिशेने पूर्वअभ्यासासाठी २०१७ साली चंद्रावर स्वयंचलित बग्गी उतरवण्यात येणार असून त्याद्वारे चांद्रभूमीचा अभ्यास करून या तळाची जागा निश्चित केली जाणार आहे. तर २०२१ पासून हा निवारा उभारण्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर वर्षभराने या ठिकाणी पहिला अंतराळवीर पाठवून या तळाची सुरुवात करण्यात येईल, अशी नासाची योजना आहे. विशेष म्हणजे ‘नासा’ मध्ये सध्या मानवी यान माहिमेसाठी जितकी तरतूद आहे, तितक्याच खर्चात हे काम करण्यात येणार असून त्यातही जर खासगी क्षेत्रातील गुंतवणूक झाली, तर हा खर्च आणखी कमी करता येणार असल्याचेही नासाने स्पष्ट केले आहे. ‘नासा’ ची ही योजना वाटावी तितकी सोपी नसून यात धोकेही आहेत. यावर सध्या अभ्यास सुरू असून लवकरच या मोहिमेची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

Leave a Comment