कॅप्सूलमध्ये अधिक प्रमाणात मांसाहारी तत्त्वाचा समावेश !

capsule
नवी दिल्ली : आजारातून सुटका होण्यासाठी ज्या कॅप्सूल डॉक्टर रुग्णांना देतात, त्यामध्ये अधिक प्रमाणात मांसाहारी तत्त्वाचा समावेश असतो. आपण शाकाहारी असो की, मांसाहारी, कॅप्सूलच्या माध्यमातून मांस, हाडे सेवन करावेच लागतात. त्याशिवाय आजारातून बरे होत नाही. परंतु यापुढे आता शाकाहारी औषधांची मागणी करू शकता. तशी सोय आता करण्यात आली आहे.

कोणताही आजार आल्यास आपल्याला डॉक्टराकडे जावेच लागते. जोपर्यंत औषध-गोळ्या घेत नाही, तोपर्यंत आजारही बरा होत नाही. मात्र, डॉक्टरकडे इलाजासाठी जाणारी बरीच मंडळी शाकाहारी असते. त्यामुळे त्यांना एखाद्या डॉक्टरने मांसाहार करायला सांगितला, तरी ते टाळतात. परंतु ब-याच कॅप्सूलमध्ये मात्र मांस आणि हाडाचा अंश असतो. त्यामुळे रुग्ण मांसाहारी असो की, शाकाहारी, त्या प्रत्येकाला कॅप्सूल घ्यावीच लागते. त्यामुळे आपण शाकाहारी आहोत, म्हणून ते औषध किंवा कॅप्सूल नाकारता येत नाही. परंतु आता शाकाहारी गोळ्या मागण्याची सोय झालेली आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार एक तज्ज्ञ समिती यासंबंधीचा निर्णय घेणार असून, या कॅप्सूलचे कवच जिलेटिनचे असावे की सॅल्यूलॉजचे असावे, यावर विचार होऊ शकतो. भारतीय औषधी नियंत्रण विभागाने वैज्ञानिक समितीला यासंबंधीची सूचना दिली असून, त्यासंबंधीचा निर्णय औषध निर्मात्यांनाच घ्यायचा आहे. याबरोबरच ही समिती सॅल्यूलॉज कॅप्सूलचे कव्हर इंडियन फार्माकोपिया कमिशनमध्ये सामिल करायचे की नाही, याचाही विचार करू शकते. जर जिलेटिनऐवजी कॅप्सूलचे कव्हर सॅल्यूलॉजचे तयार करण्याचा निर्णय झाल्यास ड्रग्ज अ‍ॅण्ड कॉस्मॅटिक विधेयकात सुधारणा करावी लागेल.

सध्या देशात सर्वत्र मिळणा-या कॅप्सूल जिलेटिन कव्हरच्या असतात. हे जिलेटिन कव्हर पशूंची त्वचा, हाडे आणि मांसापासून तयार केले जातात, तर सॅल्यूलॉजचे कव्हर वृक्षांपासून बनविले जाते. सध्या देशात तर जिलेटिनचे कव्हर असलेल्या कॅप्सूलच उपलब्ध होतात. काहीही झाले तरी रुग्णांना आजारपणात या गोळ्या घ्याव्याच लागतात. मग तो शाकाहारी असो की मांसाहारी. त्यामुळे त्यावर विचार करायची गरज नाही. मात्र, यासंबंधी नेमलेली समिती त्याचा साकल्याने विचार करीत असून, शाकाहारी कॅप्सूल कशी बनवता येईल, याचा प्राधान्याने विचार केला जात आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment