कर्जबुडव्यांच्या कर्जवसुलीसाठी बँका सज्ज

loan
सुमारे ३ हजार अब्ज रूपयांची कर्जे बुडलेल्या बँकांवर कर्जवसुलीसाठी सरकारकडून येत असलेला दबाव वाढल्यामुळे बँकांनी आता या कर्जबुडव्यांकडून आपले पैसे वसूल करण्यासाठी कर्जबुडव्यांची पत खाली जाईल असे उपाय योजण्याचा निर्णय घेतला आहे. यात कर्जदारांची नांवे सार्वजनिक रित्या जाहीर करणे, कर्जवसुलीसाठी जप्त केलेली संपत्ती विकण्यासाठी शॉपिंग मॉलचा वापर करणे, त्यासाठी मोठ्या टिव्हीस्क्रीनचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या दशकात बुडीत कर्जाचे प्रमाण बँकांच्या इतिहासात सर्वात अधिक आहे. त्यात कार्पोरेट कर्जाचे मामले अधिक आहेत. कांही प्रकरणात कर्ज बुडण्यासाठी बँकाही जबाबदार आहेत कारण त्यांनी कर्ज बुडविणार्‍यांकडून कर्ज वसुलीसाठी पुरेसा तगादा लावलेला नाही. मात्र आता कर्जवुसलीसाठी बँकांवर सरकारचा दबाव वाढत चालल्याने बँकांना कांही कडक उपाय योजणे भाग पडले आहे. त्यात कर्जदारांची नांवे जाहीर करणे जेणेकरून त्यांची मानहानी होईल हा उपाय आहे.

त्याचबरोबर कर्ज बुडविलेल्या कंपन्यांच्या कार्यालयाबाहेर प्लेकार्डसह बँक कर्मचारी धरणे धरणार आहेत. बड्या कंपन्यांच्या गुंतवणकदारांवर तसेच मुख्य अधिकार्‍यांवर दबाव आणणे हाही उपाय केला जाणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार बुडीत कर्जाचा आकडा मार्च तिमाहीतपर्यंत ३ हजार अब्जांवर गेला आहे.

Leave a Comment