अकोदरा – देशातले पहिले डिजिटल गांव

akodara
अंगणवाडीत सीसीटिव्ही, शालेय मुलांच्या हातात टॅब्लेटस, गावात सायबर केटली नावाचे कॉफी शॉप पहायचे असेल तर तुम्हाला गुजराथची सहल काढावी लागेल. अहमदाबादपासून सुमारे ९० किमी वर असलेले साबरकाठ जिल्ह्यातले छोटेसे अकोदरा गाव देशातले पहिले डिजिटल गांव किंवा खेडे बनले आहे. सहा महिन्यांपूर्वीच या गावाला डिजिटल खेड्याचा दर्जा दिला गेला असून डिजिटल इंडिया अभियानातील या गावाचे लोकापर्ण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केले होते.

या गावची लोकसंख्या आहे १२०० आणि येथे ३०० कुटुंबे वास्तव्यास आहेत. गावाचा मुख्य व्यवसाय शेती आणि पशुपालन हाच आहे. मात्र हे खेडे डिजिटल झाले आहे. सध्या येथे २० नागरिक वायफाय सुविधेचा वापर करत आहेत. वायफाय, एलईडीच्या ताकदीने दिले जात असलेले स्मार्ट शिक्षण, ई हेल्थ सेंटर, खरेदी विक्रीसाठी मनी ट्रान्स्फरची सुविधा, दुकानातील मालाच्या दराचे रोज डिस्प्ले अशा अनेक डिजिटल सोयी येथे उपलब्ध आहेत. गावात डिजिटल वॉक टॉवर कार्यरत झाला आहे.

येथे किराणा दुकानाचे व्यवहार मेसेजतर्फे केले जातात आणि येथील डिजिटल शाळेत ७१ विद्यार्थी शिकतात. अंगणवाड्यातून सीसीटिव्ही आहेत आणि शाळेत सहा संगणकही. येथे असलेल्या सायबर केटली कॉफी हाऊसलाही भेट द्या. फक्त चहासाठी २५ रूपये आणि एन्ट्री फी म्हणून पाच रूपये भरले की येथे प्रवेश मिळतो असे समजते.

Leave a Comment