चीनने बनविले कागदाप्रमाणे घडी होणारे ड्रोन

drone
चीनची राजधानी बिजिंग येथे लवकरच पहिले व्यावसायिक ड्रोन उपलब्ध होणार असून हे ड्रोन कागदाप्रमाणे घडी घालता येते. चार पंखेवाले हे ड्रोन घडी घातल्यानंतर ए फोर साईजच्या कागदाएवढे होते शिवाय त्याच्या रचनेत गरजेनुसार बदलही करता येतो. अहेड एक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी ली शियाओयू या संदर्भात म्हणाले की पुढच्या पाच वर्षात चीनमध्ये व्यावसायिक ड्रोनचा बाजार ६७.३ अब्ज डॉलर्सच्या पातळीवर पोहोचेल. या बाजारात तगडी स्पर्धाही असेल.

ट्रान्स ड्रोन ए फोर या ड्रोनचे डिर्झाइन पारंपारिक ड्रोन डिझाईनपेक्षा वेगळे आहे. यात येणारे सामान म्ंहणजे १५०० ग्रॅमचे वजन असलेला एक बॉक्स असेल आणि या ड्रोनचे नियंत्रण करणारी व्यक्ती ते सहजतेने पाठवू शकेल.याला स्वयंचलित अँटी जॅमिंग कंट्रोलर दिला असल्याने कोणत्याही वातावरणात व परिस्थितीत ते सुखरूप उडेल. यावर व्यावसायिक कॅमेरेही सहजतेने लावता येणार आहेत आणि ते वायफावने मोबाईलशी जोडताही येणार आहे.

Leave a Comment