स्टीफन हॉकिंग शोधणार दुसऱ्या ग्रहावरील जीव

stephen
लंडन- स्टीफन हॉकिंग यांनी अब्जाधीश युरी मिलनर यांच्यासोबत एक विशेष मोहीम हाती घेतली असून पृथ्वी व्यतिरिक्त दुसऱ्या ग्रहावर जीव आहे की नाही याचा शोध ते घेणार आहेत.

लाखो ताऱ्यांकडून येणाऱ्या सिग्नल्सचा या मोहिमेत अभ्यास केला जाणार आहे. या मोहिमेवर एकूण ६ अब्ज रुपये खर्च होणार आहे. या मोहिमेचे उद्घाटन रॉयल सोसायटी ऑफ लंडनमध्ये करण्यात आले आहे. आपल्या पेक्षा अधिक बुद्धिमान जीव या ब्रह्मांडात असणे शक्य आहे. त्यामुळे त्याची खातरजमा करणे आवश्यक आहे. त्यासाठीच हे अभियान असल्याचे त्यांनी म्हटले. दुसऱ्या ताऱ्यांच्या किरणांचा अभ्यास यापूर्वीही करण्यात आला आहे परंतु यावेळी १० पट जास्त विस्तार अभ्यासण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय पाचपट अधिक रेडिओ स्पेक्ट्रम स्कॅन केले जातील आणि हे काम १०० पट अधिक गतीने होईल असे हॉकिंग म्हणाले. जगातील सर्वात शक्तीशाली दुर्बिणींचा वापर या कामासाठी करण्यात येणार आहे.

Leave a Comment