ओलाची ऑनलाईन बससेवा लवकरच

olabus
टॅक्सी अॅप सेवा देणार्याच ओलाने शहरी प्रवाशांसाठी ऑनलाईन बस सेवा देण्याची योजना आखली असून याद्वारे कंम्प्लीट अर्बन ट्रान्स्पोर्ट सोल्यूशन देणारी कंपनी बनण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

येत्या दोन महिन्यात बस फिचर अॅपशी जोडले जाणार असून कस्टमर कॅब, ऑटो अथवा बस अशी कोणतीही सेवा निवडण्याची मुभा घेऊ शकणार आहे. ओलाचे वरीष्ठ कार्यकारी अधिकारी या संदर्भात माहिती देताना म्हणाले, ओला या सेवेसाठी स्वतःच्या बस खरेदी करणार नाही, तर चार्टर्ड व टूरिस्ट बसचाच वापर करणार आहे. प्रवाशाने त्याला कुठे जायचे आहे आणि कोणत्या वेळी जायचे आहे याची माहिती अॅपवर देऊन बुकींग करावयाचे आहे. म्हणजे त्याला अॅपवर जवळचे बस स्टेशन व सीट नंबर कळविला जाणार आहे.

सुरवातीला ही सेवा बंगळूर येथे सुरू होण्याची शक्यता असून ही सेवा लाँच करण्याची जबाबदारी संदीप सहानी यांच्यावर सोपविली गेली आहे. कंपनी १ अब्ज लोकांना मोबिलीटी सर्व्हीस देण्यासाठीची तयारी करत आहे आणि त्यांना भारतात उबेरबरोबर स्पर्धा करावी लागणार आहे. २०१५ अखेरीपर्यंत कंपनीने १ अब्ज डॉलर्सचा महसूल गोळा करण्याचे लक्ष्य ठेवले असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment