नील आर्मस्ट्राँग चंद्रावर गेलाच नाही - Majha Paper

नील आर्मस्ट्राँग चंद्रावर गेलाच नाही

neel
वॉशिंग्टन : ४६ वर्षांपूर्वी मानवाने चंद्रावर पाय ठेवला होता. अमेरिकेचा अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती बनली होती. तो नासाच्या अपोलो -११ मिशनचे नेतृत्व करीत होता. चंद्रावर पाय ठेवताच तो म्हणाला होता, मनुष्यासाठी हे छोटे पाऊल असेल पण संपूर्ण मानव जातीसाठी ही एक मोठी उडी ठरणार आहे.

अमेरिकेने चंद्रावर मानवाला पोहोचविण्याचा कारनामा केला असला तरी अनेकांना त्यावर संशय आहे. अनेक शास्त्रज्ञ अमेरिकेचा दावा विविध प्रकारे खोडून काढतात. अनेक शास्त्रज्ञ तर नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पाऊल ठेवलेच नसल्याचे स्पष्टपणे म्हणतात. त्यांच्यासमोरच्या पुराव्यांबाबतही ते विविध पद्धतीने आक्षेप मांडतात. मग काय नील आर्मस्ट्राँग ने चंद्रावर पाऊल ठेवल्याची बाब अगदीच खोटी आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. रशियाने आधी अंतराळात प्रवेश केल्याने अमेरिकेचा संताप झाला होता. त्यामुळे अमेरिकेच्या सरकारने चंद्रावर पाऊल ठेवण्याची पटकथा लिहिली, असा आरोप होतो.
चंद्रावर फडकाविला झेंडा

२० जुलै १९६९ ला नासाचे अपोलो-११ यान चंद्रावर उतरले असले तरीही काहींनी अमेरिकेच्या या दाव्यावर आक्षेप घेतला. हे सर्व यश एका चित्रपटाच्या शुटिंगच्या स्टुडिओमध्ये मिळविल्याचा विरोधकांचा दावा आहे. त्यासाठी अमेरिकेने जारी केलेले फोटोच त्यांनी पुरावे म्हणून सादर केले. सूर्याच्या रेडिएशनपासून बचाव करणे कोणालाही शक्य नाही. मग नासाने ते कसे साध्य केले, असा सवाल उपस्थित करण्यात आला.

Leave a Comment