तीन तासात बांधले दुमजली घर

house
चीन बांधकाम क्षेत्रात होम कन्स्ट्रक्शन क्षेत्राने अधिक गती पकडली असून प्रत्येक दिवशी नवीन तंत्रज्ञानाचा वापर येथे केला जात आहे. चीनी कंपनी झुओडा ग्रुपने तीन तासात दुमजली घर उभारून त्याची प्रचीती दिली आहे.

याविषयी माहिती देताना कंपनीचे उपाध्यक्ष ताक बूयांग म्हणाले की तीन तासांपेक्षा कमी वेळात इंटिरियर डेकोरेशन, प्लंबिग, वायरिंग व अन्य सुविधांसह हे घर उभारले गेले आहे. यासाठी वापरण्यात आलेले मटेरियल कृषी व कारखान्यातील कचर्‍यापासून तयार केले गेले आहे. हे घर फायरप्रूफ, वॉटरप्रूफ आहेच पण ९ रिश्टर स्केलचा भूकंपही ते सहज पेलू शकते. शाक्सी प्रांतात उभारण्यात आलेल्या या घरात हॉल, बेडरूम्स, किचन, रेस्टरूम आहे.

थ्रीडी प्रिंटरच्या मदतीने या घराचे साहित्य कारखान्यात १० दिवसांत बनविले गेले आणि क्रेनच्या सहाय्याने ते तीन तासात जागेवर जोडले गेले. एरवी एवढे घर तयार करण्यासाठी किमान ६ महिने लागतात. यासाठी येणारा खर्चही खूपच कमी असून १ चौरस मीटरसाठी अवघा २५ ते ३० हजार रूपयेच खर्च येतो. पारंपारिक पद्धतीने घर बांधल्यास त्यासाठी किमान ३८ लाख रूपये खर्च होतात.

Leave a Comment