बेकायदा मालमत्ता जाहीर न केल्यास कारवाई

income-tax
नवी दिल्ली – अंमलबजावणी विभागाकडून बेकायदा मालमत्ता उघड करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या खिडकीअंतर्गत ३० सप्टेंबरपर्यंत मालमत्ता जाहीर केली गेली नाही तर संबंधितांविरोधात कडक कारवाई केली जाण्याचा इशारा प्राप्तिकर विभागाने दिला.

देशातील आघाडीच्या वृत्तपत्रांतून प्राप्तिकर विभागाकडून जाहिरातींचा धडका लावण्यात आला आहे. या जाहिरातींमध्ये परदेशात बेकायदा मालमत्ता आहे? असेल तर ३० सप्टेंबरपर्यंत ती उघड करा असे या जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. करचुकवेगिरींना यातून इशारा देताना प्राप्तिकर विभागाजवळ परदेशी खात्यांची माहिती आहे. म्हणूनच अशा मालमत्तेचा कम्प्लायन्स विंडोच्या माध्यमातून खुलासा करावा. अन्यथा संबंधितांना मालमत्तेच्या मूल्याच्या १२० टक्के करासह दंड भरावा लागणार आहे. शिवाय १० वर्षाच्या तुरुंगवास आणि मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत कारवाईला सामोरे जावे लागण्याची भीती दाखवण्यात आली आहे.

Leave a Comment