देशात प्रथमच संगणक विक्रीत घट

computer
स्मार्टफोन आणि टॅब्लेटना वाढत चाललेल्या मागणीच्या तुलनेत देशात प्रथमच पर्सनल संगणकांच्या मागणीत घट झाल्याचे दिसून आले आहे. संगणकांबरोबरच नोटबुकची मागणीही घटते आहे आणि स्मार्टफोन आणि टॅब्लेटसाठीची मागणी मात्र प्रचंड वेगाने वाढते आहे असे सर्वेक्षणात दिसून आले आहे.

२०१३-१४ सालात संगणक व नोटबुकची विक्री १० टक्कयांनी घसरली होती ती २०१४-१५ सालात १५ टक्कयांनी घसरली आहे. गतवर्षात ६७.२८ कोटी संगणक व नोटबुक विकली गेली होती तो आकडा आता ३६.८१ कोटींवर घसरला आहे. संगणक नोटबुक खरेदी घटीचा सर्वाधिक फायदा स्मार्टफोनला झाला असून २०१४-१५ सालात ४४१.७५ कोटी स्मार्टफोन विकले गेले आणि ही वाढ ३३ टकके होती. टॅब्लेट विक्रीतील वाढ ४ टक्के असून या काळात २१.५८ कोटी टॅब्लेट विकले गेले आहेत. जुने संगणक बदलताना टॅब्लेट घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढत असल्याचेही दिसून आले आहे.

Leave a Comment