शिओमीचे स्मार्ट शूज

smattshoes
चीनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी शिओमीने अन्य तंत्रक्षेत्रात कंपनीचा विस्तार करण्यासाठीची पावले टाकायला सुरवात केल्यानंतर स्मार्ट शूज बाजारात आणले आहेत. यापूर्वी कंपनीने टिव्ही आणि वॉटरप्युरिफायरही सादर केले आहेत.

स्मार्ट शूजसाठी कंपनीने चायनीज स्पोर्टस कंपनी ली निंगशी सहकार्याचा करार केला असल्याचे सांगितले जात आहे. शिओमीची उपकंपनी हुआमी टेक्नॉलॉजीशी हा करार केला गेला आहे. कंपनीने बाजारात आणलेले हे स्मार्ट शूज रनिंगचा परफॉर्मन्स कसा आहे हे सांगणार्‍या तंत्रज्ञानासह आहेत. या शूजच्या सोलखाली सेंसर्स मॉड्यूल बसविले गेले आहे. त्यानुळे पळणार्‍या व्यक्तीने किती अंतर कापले, किती पावले टाकली, किती कॅलरी बर्न झाल्या व त्याच्या आरोग्यसंबंधीची अन्य माहिती डेटा ट्रॅक करून पाहता येणार आहे.

हा डेटा शिओमीच्या एमवन अॅपमध्ये ब्ल्यू टूथच्या माध्यमातून पाठविला जाणार आहे. रनर आपल्या परफॉर्मन्सचे विश्लेषण स्वतःही करू शकणार आहे आणि ते सोशल मिडीयावर शेअरही करू शकणार आहे. हे सेन्सर किमान १ वर्ष उत्तम स्थितीत राहतील असा कंपनीचा दावा आहे. दोन डिझाईनमध्ये हे शूज उपलब्ध आहेत. पैकी एक १९९ युआन म्हणजे ३२ डॉलर्स ( २०३९ रूपये ) तर दुसरे ३९९ यआन म्हणजे ४०८२ रूपयांत मिळणार आहेत. अर्थात हे शूज सध्या फक्त लि निंग स्टोअर्समध्येच मिळणार आहेत. परदेशात त्यांची विक्री कधीपासून सुरू होणार याचा खुलासा केला गेलेला नाही.