ब्रेकआऊट – हार्ले डेव्हिडसनची क्रूझर बाईक

break
हार्ले डेव्हीडसनने त्यांची क्रूझर मोटरबाईक ब्रेकआऊट या नावाने सादर केली असून या बाईकचे डिझाईन ५० ते ६० शतकातल्या मोटरसायकलप्रमाणे केले गेले आहे. मालकाला गर्व वाटावा अशी ही बाईक साडेसोळा लाख रूपयांत खरेदी करता येणार आहे.

बाईकला २१ इंची फ्रंट व १८ इंची रियर व्हील्स दिली गेली आहेत. क्रूझर बाईकसाठी वापरण्यात आलेली ही सर्वात मोठी व्हिल्स आहेत. बाईकची सीट कमी उंचीवर आहे. ही बाईक उत्तम क्वालिटीची मोटरसायकल म्हणून प्रमोट केली जात आहे. गाडीला उच्च दर्जाचा पेंट आणि क्रोमचा वापर केला गेला आहे पाहताक्षणीच ही बाईक महाग असणार याचा अंदाज येतो.

शानदार दमदार अशी ही गाडी मालक अभिमानाने मिरवतील असा कंपनीचा दावा आहे. बाईकला ६ स्पीड गिअरबॉक्स, १६९० सीसीचे इंजिन दिले गेले आहे आणि बाईकचे मायलेज आहे लिटरला १० ते ११ किमी. गाडीचे वजन आहे ३२२ किलो.