लिनोव्हाच्या ‘के३’ला टक्कर देण्यासाठी मायक्रोमॅक्सचा ‘यू यूरेका प्लस’

yu-yureka
मुंबई : भारतातील मोबाईलप्रेमींसाठी नवा स्मार्टफोन घेऊन मायक्रोमॅक्स कंपनी आली असून मायक्रोमॅक्सने यू यूरेका आणि यू यूफोरियानंतर याच सीरिजमधील नवा स्मार्टफोन ‘यू यूरेका प्लस’ लॉन्च केला आहे. या फोनचा टीझर कंपनीने यूट्यूबवर अपलोड केला आहे.

हा स्मार्टफोन आधीच्या ‘यूरेका’चा अपग्रेड व्हर्जन असून या नव्या स्मार्टफोनची ५.५ इंचाची एचडी स्क्रीन आहे. शिवाय १०८०X१९२० एवढे रिझॉल्युशन असणार आहे. ‘यू यूरेका प्लस’ या नव्या स्मार्टफोनची किंमत ९ हजार ९९९ रुपये एवढी आहे. हा फोन मोबाईलप्रेमींसाठी येत्या २४ जुलैपासून उपलब्ध करुन दिला जाणार आहे. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट ‘अमेझॉन’वर आजपासूनच नोंदणी करु शकतात. लिनोव्हाचा नुकताच लॉन्च झालेला के३ या स्मार्टफोनशी ‘यू यूरेका प्लस’ची स्पर्धा असणार आहे.

Leave a Comment