पाच वर्षात पहिल्यांदाच सोने २५ हजाराखाली!

gold
मुंबई: आज सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली असून गेल्या ५ वर्षात पहिल्यांदाच सोन्याच्या दरामध्ये ४ टक्क्यांची घसरण झाल्यामुळे सोन्याच्या किंमती २५ हजारांच्या खाली आल्या आहेत.

सध्या १० ग्रॅम सोन्याची किंमत २४९५१ एवढी असून चांदीच्या दरामध्येही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. अमेरिकेच्या फेडरल बँकेने घेतलेल्या निर्णयांमुळे लवकरच डॉलर आणखी मजबूत होणार आहे. त्याचा परिणाम सोन्याचे दर घसरण्यावर होताना दिसतो आहे. अनेक गुंतवणुकदारांनी आपली गुंतवणूक सोन्याऐवजी डॉलरमध्ये करण्याचा सपाटा सुरु केल्यामुळे सोन्याची झळाळी कमी होताना पाहायला मिळते आहे. सोन्याच्या किंमतीसोबतच प्लॅटिनमच्या दरमध्येही ५ टक्क्यांनी घसरण झाली आहे.

Leave a Comment