यूएस फोनमेकर कंपनी इनफोकसने त्यांचा लोबजेट फोर जी स्मार्टफोन भारतात सादर केला आहे. इनफोकस एम टू नावाचा हा स्मार्टफोन ५४९९ रूपयांत अमेझॉनवर उपलब्ध करून दिला गेला असून २४ जुलैपासून त्याची विक्री सुरू होणार आहे. त्यासाठीच्या ऑनलाईन नोंदणीला सुरवात झाली आहे.
लो बजेट फोर जी इनफोकस एम टू भारतात
या स्मार्टफोनसाठी ४.२ इंची एलईडी स्क्रीन, ८ जीबी मेमरी ती मायक्रो कार्डच्या सहाय्याने ६४ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, १ जीबी रॅम, अँड्राईड लॉलिपॉप ५.० ओएस, ८ एमपीचा ऑटोफोकस एलईडी फ्लॅशसह रियर कॅमेरा व ८ एमपीचाच एलईडी फ्लॅशसह फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय, ब्ल्यू टूथ, जीपीएस. एज, मायक्रो यूएसबीचा पर्याय आहे आणि एफ एम रेडिओही दिला गेला आहे.