जपानी सोनाराने बनविला सोन्याचा रोबो

gundam
जपानमधील सुवर्ण कलाकार तनाका किकिजोकू यांनी तब्बल १ किलो सोने वापरून रोबो तयार केला असून त्याचे बारसे गंडम नावाने करण्यात आले आहे. शनिवारी टोक्यो येथे भरलेल्या आर्ट ऑफ गंडम या पॉप्युलर कार्टून कॅरेक्टर प्रदर्शनात तो सादर केला गेला आहे. १८जुलै ते २७ सप्टेंबर या काळात सुरू राहणार्‍या या प्रदर्शनात गेल्या ३६ वर्षातील टिव्ही कार्यक्रमात वापरले गेलेले १ हजाराहून अधिक प्रॉडक्ट मांडले गेले आहेत.

गंडम सोनरोबोसाठी १ किलो सोन्याचा वापर केला गेला असून त्याची उंची आहे साडेबारा इंच. या रोबोसाठी १ कोटी रूपये खर्च आला आहे आणि तो १ कोटी ४० लाख रूपयांना विकला जाणार आहे असेही समजते.