चंद्रावरच्या गावाला जाऊ या

chand
युरोपिय स्पेस एजन्सीच्या महासंचालकपदावर नियुक्ती झालेले प्रोफेसर जोहान डिट्रीख वार्नर यांनी च्रंदावर गाव बसविण्याची मनीषा व्यक्त केली आहे. ते म्हणाले नासाने हे स्वप्न १९६० सालापासून पाहिले होते मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या अभावापोटी त्यांना ते सोडून द्यावे लागले. युरोपिय स्पेस एजन्सी मात्र हे स्वप्न पुरे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.

वार्नर यांच्या म्हणण्यानुसार या प्रकल्पासाठी जगातील सर्व देशांचे सहकार्य युरोपिय स्पेस एजन्सीला महत्त्वाचे आहे. चंद्रावरचे हे गाव म्हणजे घरे, चर्च अथवा टाऊन हॉल असे गांव नसेल तर तेथे मोठ्या दुर्बिणी बसविल्या जातील. मंगळवारीवर जाण्यापूर्वी आवश्यक ते प्रयोग चंद्रावरच्या वारीवर केले जातील. येथे विशाल थ्रीडी प्रिटर बेस बनविला जाईल आणि त्यात आंतरराष्ट्रीय सहकार्य गरजेचे आहे. या गावामुळे रोबोटिक व अंतरीक्ष मिशनला चालना मिळण्यास मोठी मदत होणार असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment