मध्यप्रदेशला मिळणार सर्वात स्वस्त सौर उर्जा

solar
मध्यप्रदेश सरकारला देशात सर्वाधिक स्वस्त सौर उर्जा उपलब्ध होणार असून केवळ ५ रूपये ५ पैसे दराने ही उर्जा पुढची २५ वर्षे पुरविली जाणार आहे. मध्यप्रदेश उर्जा मंत्रालयातील वरीष्ठ अधिकार्‍यांनी ही माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार मध्यप्रदेश उर्जा व्यवस्थापन कंपनीने ३०० मेगावॉट सौर उर्जेच्या पुरवठयासाठी दीर्घकालीन निविदा मागविल्या होत्या. त्याला प्रतिसाद चांगला मिळाला आणि वरील दरात सौर उर्जा पुरवठा करण्यासंबंधीचा करार झाला. व्यवस्थापकीय संचालक संजयकुमार शुल्का म्हणाले हा देशात सर्वात कमी दर आहे. आजच्या मितीला देशात सौर उर्जा साडेसहा ते सात रूपये युनिटने विकली जात आहे. कंपनीने मागविलेल्या निवीदांसाठी १०० गुंतवणुकदारांनी प्रतिसाद दिला. चांगले वातावरण आणि पारदर्शक प्रक्रियेमुळे हा प्रतिसाद होता असेही ते म्हणाले.

सौर ऊर्जा तज्ञांच्या मते मध्यप्रदेश हे सौर उर्जा निर्मितीसाठी देशातले अतिशय योग्य असे ठिकाण आहे. या प्रकल्पासाठी आलेल्या निविदांत स्काय पॉवर साऊथ एशिया होल्डिंग लिमिटेड, मॉरिशस यांनी निविदा सर्वात कमी दराची होती. रिलायन्स, अडानी, एम.के वेलस्पन, सन एडिसन व मध्यप्रदेश पॉवर जनरेटिग सिस्टीम व एनएचडीसी या सार्वजनिक क्षेत्रातील दोन कंपन्यांनीही निविदा भरल्या होत्या.

Leave a Comment