भूकंप त्सुनामीची सूचना देणारे द ब्रिन्को

brinko
वैज्ञानिकांनी सर्वसामान्य लोकांनाही घरबसल्या भूकंप अथवा त्सुनामी येणार असेल तर त्याची पूर्वसूचना मिळावी म्हणून द ब्रिन्को नावाचे उपकरण तयार केले असून ते मोबाईल अॅपच्या स्वरूपातही उपलब्ध करून दिले गेले आहे. ब्रिन्को आंतरराष्ट्रीय सेस्मिक नेटवर्कशी जोडलेले असून भूकंप अथवा त्सुनामीचा धोका असेल तर ते फ्लॅश लाईट, अलार्म वाजवून अथवा बोलून त्यासंदर्भातला इशारा देते.

मिळालेल्या माहितीनुसार या उपकरणाला नैसर्गिक संकटे मापणारी मॉनिटरींग सिस्टीम लावली गेली आहे. भूकंपाची सूचना हे उपकरण ५ ते ३० मिनिटे अगोदर देते तर त्सुनामीची सूचना कांही तास अगोदर देते. त्सुनामीची पहिली लाट आल्याची, त्यानंतरच्या धोकादायक लाटांची सूचनाही यावर मिळते. तसेच भूकंपाच्या तीव्रतेनुसार त्यातील लाईटचा प्रकाश पडतो. हे उपकरण भूकंप, त्सुनामीमुळे साधारण किती नुकसान होणार याचाही अंदाज देते. मोबाईल अॅप युजरना फोनवर अॅलर्ट मिळतो.

वैज्ञानिकांच्या मते जितकी जास्त ब्रिन्को वापरली जातील तितके नेटवर्क जास्त शक्तीशाली बनणार आहे.

Leave a Comment