ट्रायसिटी – यामाहाची तीनचाकी स्कूटर

yamaha
जपानी ऑटोमोबिल कंपनी यामाहाने त्यांची ट्रायसिटी ही तीनचाकी स्कूटर भारतात लाँच केली आहे. ही स्कूटर थायलंडमध्ये गेल्या वर्षीच लाँच करण्यात आली आहे.

१२५ सीसी इंजिन असलेली ही गाडी ज्या चालकांच्या मनात बाईक रायडिंगची भीती आहे त्यांच्यासाठी अतिशय योग्य असल्याचा कंपनीचा दावा आहे. या स्कूटरला पुढच्या बाजूला दोन चाके व मागे १ चाक आहे. गाडीचे वजन १५२ किलो असून ती अॅलॉय व्हिल्ससह आहे. सीटच्या खाली सामानासाठी पुरेशी जागा असून गाडीची किंमत आहे ३ लाख २० हजार रूपये.

Leave a Comment