गीर अभयारण्यात घेतला ११ छाव्यांनी जन्म

lions
गुजराथमधील गीर अभयारण्यात चार सिंहीणींनी ११ छाव्यांना जन्म दिला असून सर्व बाळे आणि बाळंतिणींची प्रकृती उत्तम आहे. या छाव्यांचा जन्मोत्सव वन्यप्राणी प्रेमींनाच नाही तर वनधिकार्‍यांनाही आनंद देत आहे. हे अभयारण्य आशियाई सिहांचे दुनियेतले एकमेव ठिकाण उरले आहे. येथे ५०० सिंह आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार नुकत्याच झालेल्या पावसामुळे सौराष्ट्रात आलेल्या पुराचा फटका या अभयारण्याला बसला आणि तेथील सिंह व अन्य वन्य प्राणी आजारी झाले. सुमारे ११ सिंह मरण पावले तर अनेक सिंह व अन्य प्राणी रस्त्यावर आले होते. त्यामुळे येथील सिंह अन्य सुरक्षित राज्यात पाठवावेत असा वाद आणि चर्चा सुरू झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर हे नवे छावे जन्मल्याने वनाधिकार्‍यांनी आनंद व्यक्त केला. या छाव्यांचे चित्रीकरणही करण्यात आले.

२०१३ साली सर्वोच्च न्यायालयाने गीरमधील सिंह मध्यप्रदेशातील अभयारण्यात पुनर्वासासाठी पाठविले जावेत असा आदेश दिला होता मात्र गुजराथ सरकारने सिंह पाठविण्यास नकार दिला होता.

Leave a Comment