सर्वात दणकट टूरिंग स्मार्टफोन येतोय

turing-fone
टूरिंग रोबोटिक्स इंडस्ट्री एक खास स्मार्टफोन बाजारात सादर करण्याच्या तयारीत आहे. तुटणार नांही, फुटणार नाही, हॅक करता येणार नाही, बाजारात सहजी मिळणारही नाही आणि मालकाशिवाय अन्य कुणी वापरू शकणार नाही असा सर्वगुणसंपन्न टुरिंग स्मार्टफोन येत्या कांही महिन्यात बाजारात दाखल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार लिक्विड मॉर्फियमपासून हा फोन बनविला गेला असून हे मटेरियल स्टील अथवा अ‍ॅल्युमिनियमपेक्षाही अधिक दणकट आहे. अ‍ॅपलमध्येही या मटेरियलचा वापर केला जातो मात्र तो फक्त सिम कार्डच्या जागीच केला जातो. या नव्या फोनला साडेपाच इंची स्क्रीन, अँड्राईड 5.1 ओएस दिले गेले आहे मात्र त्याला यूएसबी पोर्ट अथवा ऑडिओजेक नाही. या फोनवर केवळ ब्ल्यू टूथ काम करते तसेच अँड्राईड सॉफ्टवे्रअर सोबत सुरक्षेचे अनेक उपायही यात योजले गेले आहेत.

या फोनसाठी सर्व प्रकारची अ‍ॅप बनविली जातील मात्र त्यांच्या इनस्क्रिप्शनची खास काळजी घेतली जाईल. बोटाचा ठसा हाच याचा पासवर्ड असेल आणि हा फोन पाण्यात चुकून पडला तरी कोणतेही नुकसान होणार नाही. फक्त स्वच्छ कापडाने पुसून काढला की तो पूर्वीप्रमाणेच काम करेल. फोनचा निर्माता स्टीव्ह चाओच्या दाव्याप्रमाणे टूुरिंग फोनची बॅटरी जग बदलण्यास समर्थ आहे. या महिना अखेर या फोनच्या प्री ऑर्डर्स सुरू होत आहेत.16 जीबी च्या व्हर्जनसाठी 38 हजार रूपये ग्राहकाला मोजावे लागणार आहेत.