तब्बल १४ अपघातानंतर गुगल कारमध्ये प्रथमच लोक जखमी

google
कॅलिफोर्निया- चाचणीदरम्यान गुगलच्या बहुचर्चित स्वयंचलित कारचा अपघात झाल्याची माहिती समोर आली असून या कारचे तब्बल १४ लहान-मोठे अपघात सहा वर्षांत १९ लाख मैलाच्या चाचणीत झाले आहेत. मात्र एवढे अपघात होऊनही पहिल्यांदा लोक जखमी झाल्याची घटना घडल्याचे गुगलच्या सूत्रांनी सांगितले. कॅलिफोर्नियातील रस्त्यावर २५ कार उतरवण्यात आल्या असून चाचणी घेतली जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार एक जुलैला गुगलची लेक्सस एसयूव्ही कॅलिफोर्नियायातील माउंटेन व्ह्यूमध्ये दुर्घटनाग्रस्त झाली. एसयूव्ही एका चौकात उभी होती. दुसर्‍या कारने प्रतिताशी १७ मैल वेगाने या कारला धडक दिली. मात्र, धडक देणार्‍या कारचे कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र, गुगल कारमधील लोक किरकोळ जखमी झाले. चाचणी घेताना कारमध्ये चालकासोबत इतर दोन जण होते. ते किरकोळ जखमी झाले आहेत.

Leave a Comment