जपानमध्ये साजरा झाला रोबो विवाह

wedding
जगातील पहिला रोबो विवाह जपानमध्ये नुकताच साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे जपानमध्ये आजकाल विवाह करणार्या जिवंत माणसांचे प्रमाण अत्यंत कमी होत चालले असताना झालेला हा रोबोंचा विवाह विशेष गाजला.

फ्रायोस नावाचा रोबो आणि युक्रिन नावाची रोबो यांच्या या विवाहसोहळ्याला अन्य त्यांच्या मित्र रोबोंसह १०० जण उपस्थित होते. विशेष म्हणजे या विवाहसंमारंभात सामील होण्यासाठी ८२ डॉलर्सचे तिकीटही लावले गेले होते. रोबो वर आणि वधूंनी पारंपारिक जपानी विवाह पोशाख केला होता आणि लग्न लागल्यानंतर त्यांनी केकही कापला. ख्रिश्चन पद्धतीने वधूवरांनी एकमेकांचे चुंबनही घेतले. या विवाहानिमित्ताने संगीताचा कार्यक्रमही झाला. उपस्थितांना मेजवानी दिली गेली.यात वधूवरांनी मेजवानीचा लाभ घेता आला की नाही हे मात्र समजू शकले नाही.

Leave a Comment