ग्रीसच्या बेजबाबदारपणामुळेच दिवाळखोरी; मर्केल

angela-markel
बर्लिन – ग्रीस सरकारच्या बेजबाबदारपणावर जर्मनीच्या चान्सेलर अँजेला मर्केल यांनी जोरदार टीका केली आहे.

ग्रीस सरकार आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी तडजोड करण्यास तयार नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ग्रीसमधील आर्थिक संकटासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला त्या पत्रकार परिषदेत उत्तर देत होत्या. काही तडजोड करण्याची तयारी असल्यासच युरोप ग्रीसच्या पाठीशी उभा राहील. त्याबाबत ग्रीसला विचारणा केली आहे. मात्र त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ग्रीसमधील आर्थिक संकटसमयी युरोपिय देश काही मदत करणार का याची एका पत्रकाराने विचारणा केल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. ग्रीसला त्याची जबाबदारी कळली पाहिजे त्यानंतरच काही उपाय करता यईल असे स्पष्टपणे यावेळी मर्केल यांनी सांगितले. ग्रीस आमचा मित्रच आहे. त्याच्या संकटकाळात मदत करणे आमचे काम आहे. त्यासाठी संबंधित विविध संस्था आणि युरोझोन देशांची सरकारं प्रयत्न करतील असे मर्केल यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment