मिनी कूपरची सहा दरवाज्याची क्लबमन कार

clubman
आटोपशीर आणि जुन्या फॅशनच्या क्यूट कारसाठी प्रसिद्ध असलेल्या मिनी कूपर या ओरिजिनल ब्रिटीश ब्रँडने नवीन कलबमन ही आलिशान कार बाजारात सादर केली आहे. गतवर्षी जिनिव्हा येथे भरलेल्या प्रदर्शनात कसेप्ट कार म्हणून ही कार पेश केली गेली होती. कंपनीची ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कार आहे. १९९४ साली बीएमडब्ल्यू कार उत्पादक कंपनीने कूपरचे अधिग्रहण केले आहे.

नवीन क्लबमन कारही कंपनीच्या अन्य कारप्रमाणेच दिसायला गोलमटोल आहे. याचे वैशिष्ट म्हणजे कारला सहा दरवाजे आहेत. दोन्ही बाजूला दोन दोन आणि मागच्या बाजूला दोन दरवाजे असून कारचे टेललँप नेहमीप्रमाणे उभे नसून आडवे आहेत. पाच सीटर आणि सामानासाठी व्यवस्थित जागा असलेली ही कार भारतातही लवकरच दाखल होईल असे सांगितले जात आहे. पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही व्हेरियंटमध्ये ही कार उपलब्ध करून दिली जात आहे. कारची अधिकृत किंमत किंवा कार कधीपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार याबाबत कंपनी लवकरच खुलासा करणार असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment